आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत समाजाची सेवा करण्यास तत्पर रहावे

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या संगणक युगात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन यशस्वी व्हावे. या यशानंतर विद्यार्थ्यांनी जीवनात अधिकारी होऊन समाजाची सेवा करण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले. येथील सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याच्या पदवी प्रदान संमारभात बोलत होते. हा कार्यक्रम २५ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, जळगाव जामोद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. सद्गुणराव देशमुख हे होते. तर प्राचार्या डॉ.नीलिमा देशमुख, मराठी विभाग प्रमुख डॉ. हर्षा ढाले, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रमोद चव्हाण उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्व. भास्करराव शिंगणे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयातील सहा विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मेरीट आले. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. बी. व्होक या अभ्यासक्रमामध्ये सुमित किशोर येवले हा तृतीय मेरीट आला. तर शुभम उमाकांत कुटाफडे हा द्वितीय मेरीट आला. यावेळी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच २०२१ च्या परीक्षेत वैभव गोपाल धर्माळे हा बी व्होक फार्म इक्विपमेंट मध्ये प्रथम मेरीट आला. तसेच उन्हाळी परीक्षा २०२२ मध्ये व्हेइकल टेस्टिंग या विभागात आशुतोष पंढरीनाथ बघेकर हा तृतीय मेरिट, अनंत शैलेश पचबोले द्वितीय मेरीट व वैभव समाधान कराडे प्रथम मेरीट आला.

कष्ट व मेहनतीच्या भरवशावर अधिकारी होता येते हे जळगाव जामोदचे गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. नीलिमा देशमुख यांनी तर संचालन डॉ.प्रमोद चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.वासनिक, डॉ. दयानंद राऊत, डॉ. लांडे, प्रा. विश्वकर्मा, प्रा. काळने, प्रा. शालू लांडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांनी आयुष्यात नेहमी मोठी स्वप्ने पाहावी
विद्यार्थ्यांनी आयुष्यात नेहमी मोठी स्वप्ने पाहावी. जेणेकरून ती स्वप्न साकार करण्यासाठी नेहमी धडपड करावी लागणार. स्पर्धेचे युग असल्याने अडीअडचणीना नक्की सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात अग्रेसर राहत कष्ट व मेहनतीच्या भरवशावर अधिकारी बनून समाजात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जळगाव जामोद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...