आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:विद्यार्थ्यांनी ज्ञानवंत होऊन जीवनात यशस्वी व्हावे ; एडेड हायस्कूलमध्ये डॉ. देशपांडे यांचे प्रतिपादन

बुलडाणा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एडेड हायस्कूल येथे शिक्षक दिनाचा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे होते, तर प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. तुषार महाजन, सचिव अॅड. रामानंद कविमंडन, संचालक उबरहंडे, मुख्याध्यापक किंबहुने, उपमुख्याध्यापक जोशी, वनश्री पुरस्कार प्राप्त शिक्षक आर. एन. जाधव, निकाळजे, माजी मुख्याध्यापक आर. ओ. पाटील डवले, आर. पी. देशपांडे यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रमोद देशपांडे म्हणाले, की शाळेतील सर्व‌‌‌ शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. आज अनेक विद्यार्थी देशासह विदेशात उच्च पदावर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी ज्ञानवंत होऊन आपले भविष्य उज्ज्वल घडवावे, असे आवाहन डॉ. देशपांडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल मनोगत केले. या वेळी माजी मुख्याध्यापक आर. ओ. पाटील, प्रा. डवले यांना कै. शंकर प्रल्हाद देशपांडे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डहाके यांच्या मार्गदर्शनात व्यवस्थापक मंडळांनी शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री यांना शपथ दिली. उपस्थितांचे आभार नितीन भालेराव यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...