आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण क्षेत्रातील‎ स्पर्धा:कलाक्षेत्रात विद्यार्थ्यांनी आविष्कार‎ घडवावा : डाॅ. आशुतोष गुप्ता‎

देऊळगावमही‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या आधुनिक युगात शिक्षण क्षेत्रातील‎ स्पर्धेत टिकण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या‎ शैक्षणिक विकासासाठी शिक्षकांनी ज्ञान‎ अद्ययावत ठेवावे. आधुनिक अध्यापन पद्धतीद्वारे‎ शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी डिजिटल‎ प्लॅटफार्मचा वापर करावा. तसेच विद्यार्थ्यांनी‎ कलाक्षेत्रात आविष्कार घडवून यश मिळवावे,‎ असे आवाहन डॉ. आशुतोष गुप्त यांनी केले.‎ स्थािनक डी.आर.बी. स्कूलमध्ये‎ स्नेहसंमेलनाच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते.‎

यावेळी सरपंच वंदना भगवान शिंगणे, अंबिका‎ अर्बनचे संचालक अशोक कोटेचा, दस्तगीर‎ कुरेशी, माजी सभापती नितीन शिंगणे, डॉ. रमेश‎ बेगानी, डॉ. रिखबचंद कोठारी, शेख शगिर‎ आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. आशुतोष‎ गुप्त पुढे म्हणाले की, अजित बेगानी व त्यांच्या‎ सहकाऱ्यांनी ही शाळा सुरू करून ग्रामीण‎ भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ निर्माण केले‎ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून भावी पिढी‎ घडेल.

सरपंच वंदना शिंगणे यांनीही यावेळी‎ मनोगत व्यक्त केले. या शाळेच्या माध्यमातून‎ गावासह परिसरातील शैक्षणिक कार्याला दिशा‎ मिळेल, असे त्या म्हणाल्या. या दरम्यान‎ विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले.‎ कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष अजित‎ बेगानी, संचालक रामकिसन म्हस्के, शेख अहमद‎ शेख असगर, महेश नागरे, सुनील मोरे, सुरेश‎ कोटेचा, पुरूषोत्तम शिंगणे, शेख शकील, विनोद‎ कोटेचा, चेतन बागमार, प्राचार्या मनीषा नायडू‎ आदींनी पुढाकार घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...