आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धृपतराव सावळे यांचे प्रतिपादन:विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे जीवन चरित्र वाचावे; राजर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विशेष निवासी शिबिर यशस्वी

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न बघावी व त्या स्वप्नाच्या प्राप्तीसाठी अहोरात्र प्रयत्न करावे. तसेच महाविद्यालयीन जीवनात चांगल्या व्यक्तींचा सहवास करावा, चांगले महापुरुषांचे जीवन चरित्र वाचावे व अंगीकारावी, असे आवाहन धृपदराव सावळे यांनी केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित आणि द्वारका बहुद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन द्वारा संचालित, राजर्षी अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सत्र २०२१-२२ चे निवासी विशेष शिबिर दत्तक ग्राम सागवान येथे २१ ते २८ मार्च या कालावधीत आयोजित केले होते. राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा श्रम शिबिराच्या ७ व्या दिवशी बौद्धिक सत्राच्या कार्यक्रमास द्वारका फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार धृपतराव सावळे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुबोध चिंचोले, वक्ते म्हणून लाभलेले प्रेमकुमार शेळके हे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पी.एस.आय आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद काटकर यांनी केला. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. सुबोध चिंचोले यांनी व्यक्तीमत्व विकास या अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी आपला सर्वांगीण विकास कसा करावा व स्त्री सेवा योजना शिबिर हे एक उत्तम संधी आहे. या संधीचा उपयोग केल्यास आपल्या मध्ये सामाजिक सहजीवनाची जाणीव निर्माण होऊन एक परिपक्व व्यक्तिमत्व विकसित होईल असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर डॉ. रोडे प्रा. बी. व्ही. नरवाडे, प्रा. पायघन, प्रा. खेडेकर, प्रा. खान, प्रा. राणे, प्रा.मोडे, प्रा. कुहिरे, प्रा. राणे, गजानन सिरसाठ, प्रदीप देवकर, पुराणे, कैलास लाकडे व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी, राष्ट्रीय सेवा योजना कर्यक्रम अधिकारी प्रा. पी. एस. काटकर, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. नेहा देशमुख, प्रा. सागर सोनोने प्रा. अजिंक्य कुहिरे, प्रा. पायघन उपस्थित होते.

या बौद्धिक सत्राचे दुसरे वक्ते व सत्कारमूर्ती प्रेमकुमार शेळके यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय कसे साध्य करावे, हे आपल्या यशोगाथेच्या माध्यमातून सांगितले. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व तीव्र इच्छाशक्तीचा वापर आपले मनोबल वाढवण्यासाठी करावा. आपल्या आई- बाबांचे स्वप्न हे आपापल्या जीवांचे ध्येय बनवावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज कुहीटे व सौरभ तळाकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नीरज सुरोशे यांनी मानले. स्वागत गीत पूजा मुरडकर हिने सादर केले.

बातम्या आणखी आहेत...