आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधनिर्माण शास्त्र:स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यास‎ महत्त्वाचा : देवानंद कायंदे‎

देऊळगावराजा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याचे युग स्पर्धेचे असून त्यामध्ये‎ टिकण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे.‎ आपले ध्येय उंच असायला हवे. कनिष्ठ‎ विद्यार्थ्यांनी आपल्या वरिष्ठांचा आदर्श‎ घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन श्री‎ गजानन महाराज कृषी व शैक्षणिक‎ संस्थेचे अध्यक्ष देवानंद कायंदे यांनी केले.‎ येथील समर्थ औषधनिर्माण शास्त्र‎ महाविद्यालयात डी.फार्म. आणि बी.फार्म.‎ प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचा स्वागत‎ समारंभ पार पडला. यावेळी ते‎ अध्यक्षस्थानावरून बोलत होते. डॉ.‎ दायमा, प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे,‎ डिप्लोमा विभाग प्रमुख डॉ. गोपाळकृष्ण‎ सीताफळे, प्रा. किशोर चऱ्हाटे, डॉ.‎ हरलालका यांची प्रमुख उपस्थिती होती.‎

पुढे बोलताना कायंदे यांनी विद्यार्थ्यांनी‎ उंच भरारी घेऊन आपले आणि कुटुंबाचे‎ स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन केले.‎ प्रास्ताविकात डॉ. सीताफळे यांनी‎ द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या‎ विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन‎ करण्याचे आवाहन केले. प्रा. चऱ्हाटे‎ यांनी शिस्त व ध्येय याबाबत विचार व्यक्त‎ केले. प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे यांनी‎ यशस्वी होण्यासाठी दृढनिश्चय, समर्पण,‎ एकनिष्ठपणे असायला हवा असे यावेळी‎ सांिगतले.

यश संपादन करण्यासाठी योग्य‎ नियोजन करून निश्चय करायला हवा,‎ असे ते म्हणाले.‎ कार्यक्रमादरम्यान बी.फार्म. प्रथम‎ वर्षाचे मिस्टर फ्रेशर शुभम राठोड व मिस‎ फ्रेशर वैष्णवी मिसाळ, तर डी.फार्म.‎ प्रथम वर्षाचे मिस्टर फ्रेशर वैभव नागरे व‎ मिस फ्रेशर मनीषा बोरुडे यांची निवड‎ करण्यात आली. सूत्रसंचालन करण‎ दाभाडे, कल्याणी नागरे, देवेन संघई,‎ शीतल टेकाळे, ऋषिकेश भुरजे, शीतल‎ सोनकांबळे, रोहित देशमुख आणि गौरी‎ पाटील यांनी केले. ऋतुजा मंडलकर‎ आणि पूजा राठोड यांनी आभार मानले.‎ या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमही‎ घेण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...