आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे नेत्याची दादागिरी:बुलढाण्यात ऑफिसमध्ये घुसून सब रजिस्ट्रारला मारहाण, स्थानिकांनी लाच मागितल्याचा आरोप लावला होता

बुलढाणा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलढाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेने(मनसे)च्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी स्थानिक रजिस्ट्रार ऑफिसमध्ये घुसून एक अधिकाऱ्याला मारहाण केली. यादरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी त्या अधिकाऱ्याच्या डेस्कवरील महत्वाच्या फाईल्सही फाडल्या. डिपार्टमेंटकडून याबाबत तक्रार देण्यात आली आहे.

सब रजिस्ट्रारवर लाच मागितल्याचा आरोप

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात मनसे जिलाध्यक्ष मदनराजे गायकवाड, सब रजिस्ट्रार महादेव कडसकर यांना मारहाण करताना दिसत आहेत. महादेव यांच्याविरोधात स्थानिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडे लाच मागितलाचा आरोप लावला होता.

समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे मारहाण

याबाबत चौकशासाठी मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड सब रजिस्ट्रार कार्यालयावर गेले असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे गायकवाड यांनी अधिकाऱ्याला मारहाण केली. याबाबत गायकवाड म्हणाले की, शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक गुन्हा दाखल झाले, तरी चालतील.

बातम्या आणखी आहेत...