आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:पेनटाकळी प्रकल्पाच्या कॅनॉलची पाहणी करून अहवाल सादर करा; खा. जाधव यांच्या सूचना, 13 ऐवजी 69 कोटींचा प्रस्ताव नियामक मंडळाकडे

हिवरा आश्रम/ बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यामुळे शेतकरी विरोधी शेतकरी उभे ठाकले असून आमच्या ही विरोधी लोक भूमिका घेत आहेत. या संपूर्ण प्रकाराला पेनटाकळी प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार आहेत. हे सर्व शेतकरी बांधव आमचेच असून तात्काळ पाहणी करून पाणी सोडता येते का याचा अहवाल दोन दिवसांत सादर करा अशा सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी सोमवार रोजी आढावा बैठकीत दिल्या आहेत. यासह आमदार संजय रायमूलकर यांनी केलेल्या पाठपुराव्यांमुळे १३ ऐवजी ६९ कोटी रुपयांच्या प्रस्तावास नियामक मंडळाकडे दिला असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ९ मे रोजी बैठक पार पडली. बैठकीला खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ.संजय रायमूलकर, जिल्हाधिकारी एस.राममूर्ती, माजी आमदार शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, १ ते ११ किमीचा कॅनॉल पाझरून सतत नुकसान होत असून या परिसरातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून पंचायतराज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय रायमूलकर यांनी धरणात उडी घेतली होती. त्या नुकसान भरपाईचा ५ कोटी ३९ लाख ९ हजार ९०० रूपयांचा प्रस्ताव नियामक मंडळाकडे दिलेला आहे. तो निधी तत्काळ मंजूर करणे गरजेचे आहे. तसेच ११ किलो मीटर पुढील शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी सुकत चालल्या आहेत. गुरांना पाणी नाही, तेव्हा धरणात पाणी असताना सिंचन का करत नाही असा प्रश्न काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. आज रोजी पेनटाकळी प्रकल्पात ४३ % पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र धरण उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था कॅनालग्रस्त शेतकरी बांधवांची झाली आहे.

आयोजित बैठकीत नुकसानभरपाई द्या आणि मगच पाणी सोडा अशी ठाम भूमिका प्रथम शेतकरी बांधवांनी घेतली होती. पण कॅनॉल पाणी सोडण्याच्या सुस्थितीत नसल्याचे पाटबंधारे विभाग व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर खासदार प्रतापराव जाधव यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. आमदार संजय रायमूलकर यांनी केलेल्या पाठपुराव्यांमुळे १३ कोटी ऐवजी ६९ कोटी रुपयांच्या प्रस्तावास नियामक मंडळाकडे दिला आहे. १३ कोटी रुपयांत हे काम पूर्ण होत नव्हते.त्यामुळे कॅनॉल पूर्णपणे नष्ट करून गटार नाली केली जाणार आहे. यासाठी कमी जमीन लागणार असून ती जमीन शेतकरी बांधवांना पेरता येईल अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...