आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:मलकापुरात जैन समाजाचे प्रशासनाला निवेदन सादर

मलकापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा देवुन झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने आज २१ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. श्री सम्मेद शिखरजी हे पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. या पवित्र तीर्थक्षेत्राला झारखंड सरकारने नुकतेच पर्यटन स्थळ म्हणून निर्णय घेतला आहे.

परंतु हा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा सुमतीनाथ भगवान जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे संघपती भरत कुमार दंड, उत्तमचंद आबड, सुहास चवरे, माजी आमदार चैनसुख संचेती, सुरेश संचेती, डॉ. वैभव महाजन, सागर कोचर, जीवनलाल भंसाली, संदीप नाहर, प्रमोद पारख, मनीष पारख, दिनेश दोशी, ॲड.संचेती, प्रकाश झांबळ, संतोष संचेती, शिरीष बुरड, सतीश क्षीरसागर, शिरिष चवरे, राजेंद्र निरखे, किरण चवरे, सचिन भंसाली, आकाश डागा, गौरव दंड, कोमल बरलोटा, तेजस धूमाळे, शुभम चवरे, नीरज क्षीरसागर, विजय डागा, आदिश डागा, विनोद पारख यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...