आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये सहकार विद्या मंदिरच्या संघाने तर मुलीमध्ये प्रबोधन विद्यालयाच्या संघाने विजय प्राप्त केला. या दोन्ही संघाचे अकोला येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुण्यातील क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने १९ ते २३ जुलै दरम्यान जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात सहकार विद्या मंदिराच्या संघाने विजय संपादन केला. तर १७ वर्षा खालील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात सहकार विद्या मंदिरने शारदा ज्ञानपीठचा पराभव करीत विजय संपादन केले.
मुलीच्या गटात प्रबोधन विद्यालयाच्या संघाने शारदा ज्ञानपीठच्या संघाचा पराभव करीत अजिंक्य पद मिळवले. या दोन्ही विजयी संघातील खेळाडूंना जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी जिल्हा फुटबॉल असोशिएशनचे सचिव एन. आर. वानखेडे, पोलिस क्रिडा विभागाचे सहाय्यक शेख नासीर, राज्य क्रिडा मार्गदर्शक अनिल इंगळे, क्रिडा पत्रकार रविंद्र गणेशे, छायाचित्रकार प्रशांत सोनुने, तालुका संयोजक गोलू श्रीवास यांची उपस्थिती होती. या सामन्याचे पंच म्हणून शेख अहमद शेख सुलेमान,फवाद अहेमद, शकील चौधरी, हुजेर खान, शेख मोहसीन, सय्यद निस्तर यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.