आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे कौतुक:जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूहगान स्पर्धेत ‘पोदार’चे यश

बुलडाणा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दि युथ लीग रिक्रिएशन सेंटर बुलडाणा द्वारा आयोजित स्व. हर्षवर्धन आगाशे करंडक जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूहगान स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक यांच्या हस्ते स्व. हर्षवर्धन आगाशे करंडक, पारितोषिक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून इंडियन आयडॉल आशिष कुलकर्णी, संगीतकार देवदत्त बाजी, गायिका निधी हेगडे यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना शाळेचे संगीत शिक्षक कुंदन आराख यांनी मार्गदर्शन केले. या गीतासाठी वाद्यवृंद पोदार स्कूलचे विद्यार्थी शशांक आराख, अभिनव झगडे, प्रणव चव्हाण, नंदन चव्हाण, पीयूष नरवाडे, कुंदन आराख यांनी साथसंगत केली. या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य अजय इंगळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...