आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन द्वारा आयोजित ऑलिम्पियाड परीक्षेत सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ही परीक्षा वर्ग एक ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी असून ती विज्ञान, गणित , इंग्रजी व सामान्यज्ञान या विषयासाठी घेतली जाते. यामध्ये विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित केल्या जाते.
या परीक्षेमधील २२ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले असून इंग्लिश ऑलिम्पियाड मध्ये २७ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. यामधील रियांश मेहत्रे, त्रिलोकेश भवट , अनन्या साखारे, पीयूष मेहेर, गोजिरी पालकर, अंजिका रंजन या विद्यार्थ्यांची द्वितीय स्तरावरील परीक्षेकरीता निवड झालेली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा, प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक वृंदानी कौतुक करुन पुढीलपरीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. इंग्लिश ऑलिंपियाडच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रिया जाधव, अस्मी टेकाळे, इच्छा कंकाळ, तन्वी चौधरी, रियांश मेहत्रे, विहान खुराना, राजश्री चिंचोले, अमेय महाजन, कौस्तुभ खोबरागडे, त्रिलोकेश भवटे, अश्विन लद्धड, प्रनश्री पडोळे, अस्मी जोशी, अनन्या साखरे, शशांक देवकर, लोकेश जाधव, पीयूष मेहेर, तुषार कचरे, मयुर काळे, गोजिरी पालकर, रिद्धी मेहेत्रे, आविष्कार बावस्कर, अंजिका रंजन, यश भिसे, कपिल गायकवाड, अर्चित उबाळे, उदय चव्हाण यांचा समावेश आहे. जीके ऑलिम्पियाड मध्ये रियांश मेहत्रे, नमन जौन, आदित्य अग्रवाल, अस्मी जोशी, तेजश्री उबाळे, अश्विन लध्दड, प्रनश्री पडोळे, क्रिष्व चाटे, शशांक देवकर, अर्णव खेडेकर, स्वरुप हिंगे, पीयूष मेहेर, मयुर काळे, गोजिरी पालकर, लक्षीका पाटील, रिद्धी मेहेत्रे, अंजिका रंजन, यज्ञेश राठोड, स्वरा जोशी, अंषुला खर्चे, मंजिरी देशमुख, अमेय चोकट या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.