आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

170 वर्षांपासूनची परंपरा कायम:1 किलो मिठाची थैली सुधाकर शेळकेंनी 12,200 रुपयांत घेतली

जानेफळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नायगाव दत्तापूर येथील हनुमान मंदिरात आषाढी एकादशीला एक महिना पोथी पारायणाची परंपरा आहे. त्याचठिकाणी गणेशाची स्थापना व विसर्जनावेळी अमूर्त योग म्हणून सर्व गावकऱ्यांतून गहू, तांदूळ आणि तूरडाळ वर्गणी जमा करण्यात आली. संपूर्ण गावाचा १० क्विंटलचा भंडारा येथे पार पडतो. त्यात सर्व गावकरी आनंदाने सहभागी घेत असतात. मात्र यातून उरलेल्या साहित्याची विक्री बोलीद्वारे करण्यात येते. त्यात १ किलो मिठाची थैली सुधाकर शेळकेंनी चक्क १२,२०० रुपयांत घेतली आहे.

हनुमान मंदिराची बांधणी व विकासासाठी सहा नवयुवक मंडळी येथ प्रयत्न करत आहेत. त्याठिकाणी मंदिराचे पुजारी म्हणून गजानन तुकाराम निकम हे नि:शुल्क स्वरूपात आपली अखंड सेवा देत आहेत. १७० वर्षांची परंपरा आजही जोपासत पारायणाची सांगता व गणरायाची मिरवणूक शुक्रवारी पार पडली. ११ सप्टेंबर रोजी उरलेल्या धान्याची सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हर्राशी पार पडली. यामध्ये मंदिराचे भंडाऱ्यातील उरलेले धान्य बाजार भावापेक्षा जास्त दरात विकत घेण्यासाठी गावकऱ्यांतून चढा-ओढ होते. त्यात उरलेल्या धान्यातून एक किलो मिठाची थैली येथील सुधाकर शेळके यांनी १२,२०० रुपयांत घेतली. गहू धनंजय निकम यांनी ४ हजार ८५०, भारत निंबेकर यांनी १०० ग्राम पावडर पिशवी १ हजार २५० रूपयाला घेतली. अर्धा किलो मिठासाठी शरद निकम १ हजार १०, रामदास निकम ७८० रूपये, दिलीप निकम ५०० रूपये, प्रवीण निकम ३५० वाढीव रक्कम अनेक भाविकांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...