आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन आत्महत्या:बोराखेडी येथील अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

मोताळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ४ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

येथील प्रसिद्ध उद्योगपती कैलास गावंडे यांचा मुलगा यशवंत कैलास गावंडे या सतरा वर्षीय युवकाने त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ४ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती कैलास गावंडे यांचे भाऊ संजय गावंडे यांना दूरध्वनीवरून देण्यात आली असता त्यांनी कैलास गावंडे यांच्या घरी जाऊन पाहिले, असता यशवंत गावंडे हा मृतावस्थेत दिसून आला. अशी तक्रार संजय गावंडे यांनी बोराखेडी पोलिसांत दिली.

घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळताच ठाणेदार पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेश आगाशे, नापोका विजय पैठणे, शिवाजी मोरे, चालक शरद खर्चे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन सामान्य रुग्णालयात हलवला. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेश आगाशे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...