आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन आत्महत्या:कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

लोणार5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गळफास घेऊन कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना १० नोव्हेंबर रोजी तालुक्यातील बिबी येथे ही घटना उघडकीस आली. नारायण बबन साळवे (४५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. बिबी येथील अभय चव्हाण यांच्या शेतातील बांधावर असलेल्या झाडाला त्यांनी गळफास घेतला. सकाळी साडेआठला ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बिबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मृत साळवे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. तपास ठाणेदार तावरे, पोहेकॉ दिनेश चव्हाण करत आहे.

बातम्या आणखी आहेत...