आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्या:बुलडाण्यातील बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांची आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची खिडकीतून पाहणी करतांना बुलडाणा पोलिस - Divya Marathi
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची खिडकीतून पाहणी करतांना बुलडाणा पोलिस
  • आपल्याला नातेवाईक नाही, अश्या नैराश्यातून या दोघांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चोरी प्रकरणात बुलडाणा येथील बालनिरीक्षण गृहात, सुधारगृहात असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी टॉवेल व बेडशीटच्या माध्यमातून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज 5 डिसेंम्बर रोजी सकाळी उघडकीस आली. मंगेश डाबेराव वय 15 व गजानन पांगरे वय 17 असे या विधीसंघर्ष प्रकरणातील बालकांचे नाव असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत एक बालक त्याच सुधारगृहात होता. या दोन्ही आत्महत्येचा थरार सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला आहे.

यातील एकाची आई एका प्रकरणात कारागृहात आहे. तर दुसऱ्याचे वडील गतिमंद आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. आईला कारागृहातून सुटका व्हावी म्हणून एकाने तर दुसऱ्याने स्वतःसाठी चोरी केली. आशा 2 ते 3 चोरीतून मिळालेली 20 हजार एकाने मामाला आईच्या जामिनासाठी दिले. दरम्यान आपल्याला नातेवाईक नाही, अश्या नैराश्यातून या दोघांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान जिल्हा न्यायाधीश, बालसुधारगृह न्यायाधीश, जिल्हा पोलिस अधीक्षक आदींनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करणे सुरू आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser