आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबित:ग्रामविकास अिधकाऱ्याला तत्काळ निलंबित करा

डोणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नव्याने रुजू झालेल्या महिला सरपंचाला ‘आपण पैसे खायला बसलो आहोत, तो आपला अधिकार आहे,’ असा सल्ला देणाऱ्या आणि ‘मतदान करणारी जनता चोर अन् बदमाश आहे,’ असं वक्तव्य करणारा डोणगाव ग्रामविकास अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवार, १ सप्टेबर रोजी डोणगावातील संतप्त ग्रामस्थांनी गावकऱ्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरेवर तत्काळ गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली. डोणगाव ग्राम पंचायतमधील वार्तालाप सीसीटीव्हीत कैद झाला व हा वार्तालापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

ज्यात ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे हे महिला सरपंच यांना सांगतात की, “ताई तुम्हांला कोणीही फुकटात मतदान केले नाही सगळ्या चोट्टयांनी पैसे घेऊन तुम्हाला मतदान केले. आपल्याला पैसे खाण्याचा अधिकार बहाल केलेला आहे. त्यामुळे आपण पैसे खाल्लेच पाहिजेत’ अशी अनेक विधाने या व्हायरल व्हिडिओमध्ये केलेली आहेत. तसेच मतदार राजाला चोर संबोधणे हा लोकशाहीस काळिमा फासल्यासारखे आहे. अशा ग्राम विकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबित करा, अशी मागणी निवेदनाद्वारे गावकऱ्यांनी पोलिस स्टेशनला केली आहे. तसेच चनखोरे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली असून, या निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...