आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पीक विम्यासाठी स्वाभिमानीचे श्रद्धांजली आंदोलन

मलकापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामा होवूनही पीकविम्याचे पैसे मिळाले नाही. तर दुसरीकडे कार्यालय तीन दिवसांपासून बंद आहे. त्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी एआयसी पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला श्रद्धांजली अर्पण करून रोष व्यक्त केला.

तालुक्यातील ५ हजार ७०० शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. परंतु त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. या तक्रारीवरून काही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले तर काही शेतकऱ्यांचे पंचनामे अद्यापही करण्यात आले नाही. त्यात विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांजवळून पैसे घेतल्याचे वारंवार निदर्शनास आले. परंतु तरी सुध्दा कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...