आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शेत मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन

चिखलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेत मोजणीसाठी भूमि अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करून पैशांचा भरणा केला आहे. परंतु वर्ष उलटूनही उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने आक्रमक पावित्रा घेत स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, भगवानराव मोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात आज २ जून रोजी ठिय्या आंदोलन केले.

मागण्यांची पूर्तता करण्याचे अश्वासन वरिष्ठांकडून दिल्याने चार तासानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. या आंदोलनात भगवान मोरे, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भारत वाघमारे, अनिल वाकोडे, रविराज टाले, शुभम पाटील, बाळकृष्ण पाटील, अमोल तिडके, रवि मेहत्रे, सुनील मोरे, सरदारसिंग इंगळे, औचितराव वाघमारे, मधुकर सोळंकी, अनिल शिराळे, गोपाल परसणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धूळखात पडलेल्या रिकाम्या खुर्चीला घातला हार
प्रभारी अधिकारी सुद्धा कार्यालयात येत नसल्याने कार्यालयातील टेबलवर चढलेल्या धुळी वरुन उघड झाले. अधिकारीच नसेल तर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहणार कसे व प्रलंबित कामे होणार कशी, असा प्रश्न उपस्थित करत रिकाम्या खुर्चीला पुष्पहार टाकून स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...