आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्ययात्रा:मलकापूर येथेही कोश्यारींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

मलकापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणारे भगतसिंग कोश्यारींची शिवसेनेच्या वतीने अंत्ययात्रा काढून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, उपजिल्हा प्रमुख संजयसिंह जाधव, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, युवा सेना जिल्हाध्यक्ष शुभम पाटील, रवींद्र भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख गजानन ठोसर, तालुका प्रमुख दीपक चांभारे यांच्या उपस्थितीत कोश्यारींची डफडे वाजवून शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर तहसील चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...