आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिक पदाधिकारीकडून सत्कार:‘शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा’

खामगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा येथील शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे मंगळवारी करण्यात आली.३ सप्टेंबरला बुलडाणा येथे शिवसेनेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा व वरिष्ठ शिवसैनिक पदाधिकारी वर्गाकडून सत्कार व मार्गदर्शन तसेच महत्त्वांच्या निर्णयासंबंधी कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी शिवसेनेचे वरिष्ठ नेते व जिल्ह्यातील सर्व आजी, माजी शिवसैनिक कार्यक्रमाला एकत्र आले होते. परंतु कार्यक्रम सुरू असताना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड व इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात येऊन कार्यक्रम स्थळी ठेवलेल्या खुर्च्या बसलेल्या शिवसैनिकांना मारत व्यासपीठाच्या दिशेने गेले. या वेळी त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना देखील मारहाण केली. या वेळी तिथे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेचा तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, प्रा. अनिल अमलकर, विधानसभा संघटक रवी महाले, तालुकाप्रमुख विजय बोदडे, शहर प्रमुख विजय इंगळे, सुभाष ठाकूर, देविदास उमाले, गजानन होगे, आनंद चिंडाले, भारती चिंडाले, श्रुती पतंगे, सुरेखा चिलवंत, दीपाली श्रीनाथ, दिनेश पतंगे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...