आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचालकांची मागणी:संग्रामपूर तालुक्यातील अवैध लॅब संचालकाविरुद्ध कारवाई करा

संग्रामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुकयात दहा क्लिनिकल लॅब असुन त्यामध्ये दोन ते तीन लॅब अनधिकृत आहेत. त्यामुळे अशा अवैध लॅब संचालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खाजगी प्रयोग शाळा संचालकांनी आज शुक्रवारी एका निवेदनाद्वारे तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार व ठाणेदार यांच्याकडे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार तालुक्यात दोन ते तीन लॅब संचालकाची शैक्षणीक पात्रता नसतांना व शासकीय नोंदणी नसतांना त्यांनी अवैधरीत्या क्लिनिकल लॅब सुरु केले आहेत. हे बोगस लॅब धारक रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत. मागील महिन्यात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता अनेक लॅब रिपोर्टवर ज्यांचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नाव आहे. ते हजर नव्हते. यावरून बारावी पास व खोटे डिप्लोमा घेऊन लॅब चालवत असल्याचे निदर्शनास आले. तसेच लॅबचे रिपोर्ट पेज, आधार कार्ड, नोंदणी प्रमाणपत्र घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नोंदणीकृत प्रयोगशाळा तंत्रज्ञ व लॅब संचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बोगस लॅबवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासगी प्रयोगशाळा संचालक विजय रहाटे, प्रशांत इंगळे, अशोक वानरे, सय्यद वसीम, शेख किस्मत, देवानंद तायडे, निखिल शेळके, राहुल गावंडे यांनी तहसीलदार व ठाणेदार यांच्याकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...