आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:महापौर पेडणेकर यांच्यावर कारवाई करा; भाट समाजाच्या वतीने पोलिस स्टेशनला निवेदन

नांदुरा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाट समाजावर महाराष्ट्रात योगींची स्तुती करणारे भाट तयार झाले आहेत, असे आक्षेपार्ह विधान केल्याने भाट समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे निवेदन भाट समाज बांधवांच्या वतीने पोलिसांना देण्यात आले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना महाराष्ट्रात योगींची स्तुती करणारे भाट तयार झाले आहेत, असे भाट समाजाबाबत विधान केल्याने भाट समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण भाट समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून अल्पसंख्याक समाजाला वेठीस धरुन आपली राजकीय पोळी शेकून घेणे कितपत योग्य आहे. असा प्रश्न समाज बांधवांकडून उपस्थित केल्या गेला आहे.

या निवेदनावर आरक्षण समिती सदस्य योगेश नवले, अखिल महाराष्ट्र भाट समाज प्रदेश सचिव राहुल चोपडे, जिल्हा अध्यक्ष विशाल नवले, श्रीकृष्ण शिरसाट, आशिष चोपडे, सचिन चोपडे यांच्यासह असंख्य समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...