आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुबाडणूक:जादा दराने बाँडची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा ; आंदोलन करण्याचा रिपब्लिकन सेनेचा इशारा

चिखली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात जादा दराने बाँडची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला आहे. शहरातील जुन्या तहसील कार्यालयातील स्टॅम्प विक्रेते शंभर रुपयाचा बाँडपेपरची दीडशे रुपयापर्यंत विक्री करून गोरगरीब नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, मजूर वर्ग, विधवा महिला व निराधारांची लुबाडणूक करीत आहेत. इतरत्र कोठेच बाँड मिळत नसल्यामुळे नाइलाजास्तव गोरगरिबांना जादा पैसे देवून बाँड पेपर खरेदी करावा लागत आहे. बाँडची प्रत्येकाला आवश्यकता असल्यामुळे कोणीही तक्रार करत नाही. परंतु याकडे तहसीलदार, उपकोषागार, दुय्यम निबंधक अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

त्यामुळे बाँडपेपरची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हा साळवे, जिल्हा महासचिव सलीम भाई, तालुका अध्यक्ष श्याम लहाने, कामगार सुरेश इंगळे, शहराध्यक्ष सुनील सोळंके, महिला उपाध्यक्ष उषाताई गवई, शहर कार्याध्यक्ष सतीश इंगळे, दीपक जाधव, संजय मोहिते, लखन कुसळकर, सौरभ बावस्कर, गजराज जाधव यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...