आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:इस्लाम धर्मावर अभद्र टिपणी करणाऱ्या‎ रामदेवबाबा यांच्यावर कारवाई करा‎

मोताळा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लाम धर्मावर अभद्र टिपणी करीत दोन‎ समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य‎ करणाऱ्या रामदेवबाबा यांच्यावर कारवाई‎ करण्यात यावी, अशी मागणी तालुका‎ एमआयएमच्या वतीने आज ६ फेब्रुवारी‎ रोजी तहसीलदार यांना दिलेल्या‎ निवेदनातून करण्यात आली आहे.‎ त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार,‎ राजस्थान येथील महासभेत बाबा रामदेव‎ यांनी इस्लाम धर्मावर आपत्तीजनक‎ टिप्पणी केली आहे. त्यांनी केलेले वक्तव्य‎ हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे‎ आहे.

वास्तविक पाहता इस्लाम धर्म‎ कधीच कोण्या धर्माच्या विरोधात‎ बोलण्याची शिकवण देत नाही. तर प्रत्येक‎ धर्माच्या महिलेचे रक्षण करण्याची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिकवण देत आहे. असे असताना‎ रामदेवबाबांनी केलेले वक्तव्य हे‎ आपत्तीजनक आहे.‎ त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात‎ यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल,‎ असा इशारा एमआयएमचे तालुकाध्यक्ष‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आरीफखान बिबन खान, मोहसीन खान,‎ रोशन पठाण, अ. मलीक, रियाज कुरेशी,‎ शे. इब्राहिम, सलीम बेग, मोईन अख्तर,‎ रिजवान खान, हबीब खान आणी उबेद‎ खान यांनी दिला आहे. यावेळी अनेक‎ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...