आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:उपचाराआधी पैशांची मागणी करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करा ; ; शहरातील पत्रकारांची मागणी

जळगाव जामोदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपचार सुरू करण्यापूर्वीच पैशाची मागणी करून असभ्य वर्तन करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार विनोद चोपडे यांनी आज ६ जून रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. येथील विनोद चोपडे हे ५ जून रोजी डॉ. अजित जाधव यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ गेले होते. परंतु हॉस्पिटलच्या कंपाउंडरने उपचारापूर्वीच त्यांना असभ्य भाषेत पैशांची मागणी केली. त्यानंतर डॉ. अजित जाधव यांनी सुद्धा त्यांच्या कंपाउंडरचे समर्थन करत त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. यावेळी संजय पारवे, राजेश लहाशे, गुलाबराव इंगळे, पवन चिपडे हे विनोद चोपडे यांच्या सोबत होते. याचा पत्रकारांनी निषेध करून भविष्यात असे प्रकार होऊ नये, यासाठी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील पत्रकारांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...