आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त उभ्या वाहनांवर कारवाई करा; शहरातील नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन

लोणार21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महा मार्गावर बेशिस्त उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केेली आहे. लोणार हे अ दर्जाचे पर्यटन स्थळ असून शहराची लोकसंख्या ही तीस हजारां पेक्षा जास्त आहे. शहरात मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी अनेक खेड्या-पाड्यातील नागरिक खरेदीसाठी शहरात येतात.

परंतु शहरात दाखल होताच त्यांना जागोजागी उभे केलेल्या बेशिस्त वाहनांचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्त्यावर तीन चाकी, चार चाकी, माल वाहतूक वाहने सर्रास उभी करण्यात येतात. रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहना मुळे रस्ता अरुंद होतो. त्यामुळे दुसरे वाहन तिथून निघू शकत नाही. परिणामी वाहन धारकांचे लहान-मोठे वाद होत आहेत. शिवाय या बेशिस्त वाहनांमुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्या सोबतच रस्त्यावरील अतिक्रमित फळाच्या गाड्या या रस्त्याच्या मधोमध लावल्या जात आहेत. त्यामुळे फळ गाडी व वाहनधारकांमध्ये वाहनाच्या धक्क्यावरून वादविवाद होतात. वेळप्रसंगी या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होण्याची शक्यता आहे.

याची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन बेशिस्त वाहन धारकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनिल तेजराव मापारी, ॲड. भागवत मापारी, रौनक अली सिद्दिकी, ॲड. दीपक मापारी, गोपाल मापारी, शाम जारे, बाळासाहेब आखाडे, प्रा. वसंत जनार्दन मापारी, प्रमोद चनखोरे, निखिल मापारी, शेख दादू अमजद खान, श्याम शिंदे, सुरेश बेदमुथा, अभिजीत सानप, शिवा जाधव, गजानन चाटे, प्रकाश अवसरमोल, खाजा भाई, शेख इम्रान शेख नबी, भूषण शेषराव मापारी, दीपक मापारी, विनायक सोनुने, सुरेश मोरे, कैलास अंभोरे, शिवाजी कोकाटे, सोपान कुलाल, राम मापारी यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...