आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:रहदारीस अडथळा करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करा; नांदुरा येथील ग्रामस्थांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

नांदुरा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेल्वे स्टेशन चौक या दरम्यान रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या फळ व भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे ऐका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, नांदुरा ते मोताळा या रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. शहरातील रेल्वे स्टेशन चौक येथून या कामाला सुरुवात झाली आहे. रस्ता कामामुळे या रोडवर सतत मोठी जड वाहने, टिप्पर व इतर प्रवासी वाहतूक सुरु असते. परंतु रेल्वे स्टेशन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान भाजी व फळ विक्रेते ठरावीक जागे व्यतिरिक्त रस्त्यावर दुकाने लावून व हातगाड्या लावून बसत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या भागात बँका, शाळा, दवाखाने असल्याने नेहमी या रस्त्यावर गर्दी असते. त्यामुळे रस्त्यावर फळ व भाजीची दुकाने लावणाऱ्यांमुळे वाहनांना व विद्यार्थी, पादचाऱ्यांना गर्दीतून वाट काढत जावे लागत आहे. परिणामी या भागात एखादा अपघात होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या व ठराविक जागेचा व्यतीरीक्त इतर ठिकाणी भाजी तसेच फळ विकण्यास बंदी घालून आणि रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी शिवदास रामदास कुटे, रामेश्वर चौरे, शे.आरीफ शे ईसा, शे. मोबीन, फिरोज खान यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...