आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:कुपोषण मुक्तीसाठी राष्ट्रीय पोषण अभियानाचा लाभ घ्या ; शिवराज कायंदे

दुसरबीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुपोषण मुक्त देश करण्यासाठी सरकारच्या वतीने देशभरात राष्ट्रीय पोषण कार्यक्रम सुरू केला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये दारिद्र्यामुळे लोकांना पुरेसे व पोषक भोजन मिळत नाही. अशा कुटुंबामध्ये एखाद्या गर्भवती महिलेबरोबरच नवजात शिशुंवरही याचा प्रतिकूल परिणाम होतो. एका अहवालानुसार आज देशातील जवळपास प्रत्येक तिसरे मूल कुपोषित आहे. देशातील ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रीय पोषण अभियान सुरू केले आहे. याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवराज कायंदे यांनी केले आहे.

रूम्हणा येथे अंगणवाडी केंद्रामध्ये शासन निर्देशानुसार पोषण अभियान कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच कारभारी काळे होते. तर प्रमुख उपस्थितीत उपसरपंच शिवराज कायंदे, सचिव विनोद सातपुते हे होते. पुढे बोलतांना कायंदे म्हणाले की, मोबाइल ऍप्लिकेशन वर ग्रोथ चार्टच्या ऑटोप्लेटिंगच्या मदतीने मुलांच्या शारीरिक विकासाची माहिती मिळते. यामध्ये ०-५ वर्षे वयोगटातील मुलांचे वजन केले जाते. अंगणवाडीमध्ये मुलांची उंची मोजली जाते व याचे रेकॉर्ड सीएएस ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये केले जाते. राष्ट्रीय पोषण अभियान अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत राहणाऱ्या महिला व लहान मुलांच्या कल्याण हेतू सुरू केले आहे. नीती आयोगद्वारा एक आराखडा बनवला गेला आहे, ज्यामध्ये सन २०२२ पर्यंत कुपोषित मुक्त भारत किंवा कुपोषण मुक्त भारताचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. केंद्र सरकारद्वारे मुलांना कुपोषणापासून मुक्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. कुपोषित मुक्त भारत अभियानाचे नाव बदलून सरकारने राष्ट्रीय पोषण कार्यक्रम केले आहे. तसेच सरकारने कुपोषण मुक्त भारताला प्राधान्य दिले आहे व देशातून कुपोषण हद्दपार करण्यासाठी सरकार गंभीररीत्या प्रयत्न करत आहे. त्याचा लाभ ग्रामीण भागातील जनतेने घ्यावा. कार्यक्रम राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका अर्चना आघाव, लता कायंदे, नित्रा डोळे, हरिभाऊ जायभाये यांनी परिश्रम घेतले.

२०१८ मध्ये झाली अभियानाची सुरूवात
प्रत्येक वर्षी १ ते ७ सप्टेंबर दरम्यान न्युट्रिशन सप्ताह साजरा केला जातो. राष्ट्रीय कुपोषण अभियानाची सुरुवात २०१८ मध्ये करण्यात आली असून त्याअंतर्गत देशातील लहान मुले, गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी पोषण संबंधी अधिक सुधार करणे आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ साठी पोषण संबंधी योजनांच्या मजबुतीकरणासाठी पोषण कार्यक्रम आणि पोषण अभियानाचा निर्णय जाहीर केला आहे. नव्या योजनेला मिशन २.० असे नाव देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...