आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिखली परिसरातील शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. रविकांत तुपकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल चिखलीतील व्यापारी संतोष गाडे व त्यांच्या बंधूंना विकला होता. परंतु गाडे बंधूंनी आपले पैसे आर.टी.जी.एस. करतो किंवा काही दिवसांनी देतो, असे म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत व आता ते फरार असल्याची माहिती आहे.
यासंदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी तक्रारी करत आहेत. शेतकरी मोठ्या विश्वासाने आपला शेतमाल व्यापाऱ्यांना विकतात पण गेल्या काही वर्षांपासून काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच ज्यावेळी शेतकरी व्यापाऱ्यांना आपला माल देतो त्यावेळी व्यापाऱ्यांचा आर.टी.जी.एस. करण्याचा आग्रह असतो तर त्या ऐवजी शेतकऱ्यांना रोखीने पैसे मिळण्याची व्यवस्था असावी. जेणेकरून शेतमाल विकता वेळीच शेतकऱ्यांना संपूर्ण पैसे मिळाले तरच शेतकऱ्यांची फसवणूक होणे थांबेल. तसेच फसवणूक करणाऱ्या अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. तरी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.