आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार आकाश फुंडकर यांचे निर्देश:पाणीटंचाई भासणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करा; प्रशासकीय इमारतीत आढावा बैठक

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोणत्याही गावात पाणीटंचाई भासणार नाही, याची दक्षता घेवून तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी आज सोमवारी प्रशासनाला दिले आहेत. स्वातंत्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पाणीटंचाई, जलजीवन व स्वच्छ भारत मिशन, महाआवास अभियान, ग्रामीण घरकुल योजना आढावा सभा आज ९ एप्रिल रोजी महात्मा गांधी प्रशासकीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मदार अॅड. आकाश फुंडकर बोलत होते. यावेळी मंचावर मदार अॅड. आकाश फुंडकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह जाधव, तहसीलदार अतुल पाटोळे, गटविकास अधिकारी चंदनसिंह राजपूत, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उपअभियंता विलास चव्हाण, महावितरण कार्यकारी अभियंता अजितकुमार दिनोटे, उपकार्यकरी अभियंता राहुल बाहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी खामगाव तालुक्यातील सर्व गावांचा विस्तृत आढावा घेतला.

पुढे बोलताना मदार अॅड. आकाश फुंडकर म्हणाले की, यंदा गावात पाणीटंचाई असेल असे वाटले नव्हते. परंतु अनेक गावात पाणीटंचाई असल्याचे माहिती पडले. बहुतांश गावात पाणीपुरवठा योजना आहेत. तरीही गावांमध्ये पाणीटंचाई भासत आहेत. अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहेत, ते उन्हाळ्यापूर्वी पूर्ण करावे, आदेश दिले.

तसेच घरकुलांचा लाभ गरिबांनाच मिळावा याची काळजी घ्यावी, गावातील लोकांना विश्वासात घेऊनच घरकुलाची यादी बनवावी. सर्व योजना वर्षानुवर्षे टिकतील असे कामे करावे. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिल्यास गावातील शेतकरी, शेतमजूर व लोकांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, असेही आमदार अॅड फुंडकर म्हणाले. प्रत्येक तलाठी, ग्रामसेवकाने दररोज गावात थांबवून लोकांची कामे करावी, कामात हलगर्जी करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, अशा सूचना आमदार अॅड. फुंडकर यांनी दिल्या. आढावा बैठकीला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...