आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाण‎ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा‎

मोताळा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान येथील‎ स्वस्त धान्य दुकानदारास मारहाण करणाऱ्या‎ व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी‎ सोबतच ई पॉस मशीनमधील नेटवर्क स्लो‎ असल्याने लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचे‎ ऑफलाईन धान्य वाटप करण्याची परवानगी‎ देण्यात यावी तसेच अपुऱ्या धान्य‎ पुरवठ्यामुळे दुकानदारांना होणाऱ्या‎ त्रासाबाबत येथील तहसीलदार, ठाणेदार यांना‎ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या‎ वतीने १ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले.‎ निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,‎ शासनाकडून दिवाळी वाटपाकरिता आनंदाचा‎ शिधा आणि इतर योजनेचे धान्य देण्याचे‎ शासनाने जाहीर केले आहे. ऑक्टोबर‎ महिन्यात मिळालेल्या अपुऱ्या धान्यामुळे‎ तालुक्यातील आज ही जवळपास ७७‎ दुकानदार धान्यापासून वंचित आहे.

तसेच‎ मागील महिन्याचे प्रधानमंत्री गरीब कल्याण‎ योजनेचे धान्य तालुक्यातील ९५ दुकानदारांना‎ अद्याप मिळाले नाही. या प्रकारामुळे संग्रामपूर‎ तालुक्यातील वडगाव वान येथील स्वस्त‎ धान्य दुकानदारास अपुरे धान्य वाटप का‎ करतो या कारणावरून लाकडी दांड्याने‎ मारहाण करून इ पॉस मशीन फोडली आहे.‎ असा प्रकार मोताळा तालुक्यात सुद्धा घडू‎ शकतो. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारास‎ मारहाण करणाऱ्या त्या व्यक्तीवर कठोर‎ कारवाई करण्यात यावी तसेच इ पॉस मशीन‎ तांत्रीक कारणाने व्यवस्थित चालत नसल्याने‎ धान्याची वाटप रखडली आहे.

ही धान्य वाटप‎ ऑफलाइनरित्या वाटप करण्याची परवानगी‎ देण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात‎ आले आहे. वरिष्ठ स्तरावरून न्याय न‎ मिळाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन‎ छेडण्याचा इशारा निवेदनाअंती देण्यात आला‎ आहे. निवेदनावर धान्य दुकानदार संघटनेचे‎ तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, एस.बी.जाधव,‎ ए.टी.पाटील, पी.एस.पाटील, राजू राऊत,‎ एम.जी. नाईक, विशाखा महिला बचत गट,‎ पी.पी.मारोडकर यांच्यासह असंख्य‎ दुकानदारांच्या स्वाक्षरी आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...