आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेहकर सोनाटी येथील स्व. दादासाहेब चौधरी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेच्या ५० व्या वर्धापनानिमित्त शाळेने ही प्रदर्शन आयोजित करण्याची मागणी केली होती. पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि विज्ञान तालुका संघटनेने ती मान्य केली. त्यानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनाला शिक्षक आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार डॉ. संजय रायमूलकर, संतोष मापारी, गटशिक्षणाधिकारी लव्हाळे, संस्थाध्यक्ष संजय बदर, उपाध्यक्ष ठोकरे, सचिव गजानन कातडे, संचालक बळीराम ठाकरे, उज्वल वाघमारे, केंद्रप्रमुख राजेंद्र वाघ, विस्तार अधिकारी पी. सी. पवार, सोनाटी संस्थानचे अध्यक्ष डॉ. शेषराव बदर, सुदेश लोटे, हर्षल सोमन, विज्ञान संघटनेचे अध्यक्ष गजानन पाटील, उपाध्यक्ष जी. के. देशमुख, सचिव धोंडगे, सहसचिव सिद्धार्थ डोंगरदिवे, कार्याध्यक्ष आखरे, कोषाध्यक्ष भागवत दळवी, सल्लागार टी. एम. गायकवाड, दिलीप आस्तरकर, कुंदन ठुले, बी. के. बदर, आसाराम अंभोरे, भीमराव मेरतकर, राजाराम वाटसर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विजयी स्पर्धकांसह संघटनेचे रहाटे, कृष्णा सासवडकर यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्याची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.
आमदार किरणराव सरनाईक आणि आमदार संजय रायमूलकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धोंडगे यांनी केले. या दोन दिवसीय कार्यक्रमाचे संचालन मनोहर ईटेवाड, सिद्धार्थ डोंगरदिवे, शेषराव काटकर, गजानन म्हस्के यांनी केले. प्रा. यू. के. वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गजानन लिंबे, नरेंद्र पवार, विश्वनाथ खोडवे, हेमंत बदर, मनोहर ईटेवाड, भागवत पडघान, संजय दांदडे, कैलास पागोरे, विनोद पागोरे, विलास डाखोरे, आशा वानखेडे, प्रमोद सुरडकर, आसोले मुळे, सनक, विष्णुपंत बदर, महादा गुंजकर यांनी पुढाकार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.