आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय मंडळींची भेट:रस्त्याच्या मागणीसाठी तामगाव ग्रामस्थांचे उपोषण

संग्रामपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामगाव शिवारातील गट नं. २५.२४.२३ आण्याचा बारीवाटीचा रस्ता लोखंडी अँगल लावून बंद करण्यात आल्यामुळे नं. २५ शेताची तसेच इतर कामे करण्यासाठी जाता येत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली. त्या अनुषंगाने तहसीलदार यांना तामगाव येथील ग्रामस्थ यांनी संग्रामपूर तहसीलदार यांना निवेदन सादर केले होते. मात्र त्यावर कुठलाही निर्णय घेतला नसल्याने आज १ ऑगस्ट रोजी संग्रामपूर तहसीलदार कार्यालयासमोर तामगाव येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

गट २३-२४ मध्ये अकृषक प्लॉट पडलेले असून गावातील बऱेच नागरिक त्या ठिकाणी घरे बांधून राहत आहेत. आज पर्यंत सदर रस्ता चालू होता. परंतु रस्त्यात लोखंडी अँगल लावून बंद करण्यात आल्यामुळे जाण्यायेण्याचा रस्ताच उपलब्ध राहिला नाही. या बाबत ग्रामपंचायत यांना देखील कळवण्यात आले. मात्र सदरचा रस्ता मोकळा करुण देण्यास असमर्थ असल्यामुळे १ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय समोर तक्रारकर्ते तामगाव ग्रामस्थ यांनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. यावेळी दिवसभर उपोषणकर्ते यांची तालुक्यात राजकीय मंडळींनी भेट घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...