आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक कामे:शिक्षक समितीचे उद्या जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

मेहकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांना सातत्याने करावी लागणारी शैक्षणिक कामे, मोठ्या प्रमाणात शिक्षकांची रिक्त पदे, या बाबींचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने “आम्हाला फक्त शिकू द्या” म्हणत शिक्षकांनी सोमवार, ८ ऑगस्टला दुपारी २ ते ५ या वेळेत बुलडाणा जि. प.समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उपक्रमांचा भडीमार, दररोज ऑनलाइन माहिती संकलन, गैरवाजवी प्रशिक्षणाचा अतिरेक, शालेय पोषण आहाराचे मोजमाप व अशैक्षणिक कामाचा ताप, यामुळे शिक्षक अध्यापन कार्यापासून प्रवृत्त होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असून, याचे खापर शिक्षकांवर फोडले जाते. त्यामुळेच हे धरणे आंदोलन आयोजित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...