आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमाचे आयोजन:युगधर्म पब्लिक स्कूल येथे शिक्षक दिन ; यशस्वी नागरिक बनवण्यासाठी प्रोत्साहन

खामगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ऋषी संकुलातील युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षकदिन साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने शिक्षकांना प्रेरणा मिळावी व अधिक उत्तरोत्तर चांगले कार्य करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना देशाचा यशस्वी नागरिक बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी विद्यालयात एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये ३ सप्टेंबरला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमार्फत शिक्षकांसाठी विविध मथळ्याअंतर्गत मतदान घेण्यात आले. त्यामध्ये बेस्ट मोटिव्हेशनल टीचर, मोस्ट हेल्पफुल टीचर, मोस्ट क्रिएटिव्ह टीचर, मोस्ट पोलाइट टीचर तसेच मोस्ट हेल्पफुल ताई या श्रेणींमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी मतदान केले.

या मतदान कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मतदानाची प्रक्रिया कशी होते. या बाबतची माहिती प्रात्यक्षिकासह विशद केली. शिक्षक दिनी या मतदानाचा निकाल लावून पारितोषिकांचे व बक्षिसाचे वितरण करण्यात आले. मतदानाच्या निकालाला बघून विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांमध्येही उत्साह दिसून आला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या भावना मंचावर येऊन व्यक्त केल्या. तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांवर कविता सादर करून उपस्थित शिक्षकांची मने जिंकली. यावेळी संस्थाध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी आपल्या विद्यालयाचा प्रत्येक विद्यार्थी आदर्श विद्यार्थी तसेच देशाचा यशस्वी नागरिक कसा बनेल यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्राचार्या भाग्यश्री देशमुख यांनी शिक्षकांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि संबंधित कार्य विशद केले. कार्यक्रमाबाबत सचिव मधुर अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयोजित केला होता. सूत्रसंचालन शिक्षक यशवंत बोदडे यांनी केले, तर आभार अनुपकुमार गायकवाड यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...