आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांना सन्मानपत्र:सिद्धार्थ विद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात ; शिक्षकांच्या कार्याचा गुणगौरव

मंगरूळपीर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

५ सप्टेंबर २०२२ शिक्षक दिन साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती दिवंगत सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती तसेच संस्थेचे संस्थापक सचिव बुद्धवासी रामकृष्ण उपाख्य भाऊसाहेब कांबळे यांची जयंती व पुण्यतिथी निमित्य अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमाकरिता शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका किरण कांबळे अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भाऊ कांबळे साहेब ,ज्येष्ठ शिक्षिका सुलभाताई कांबळे ,शाळेचे पर्यवेक्षक सिद्धार्थ कांबळे, ज्येष्ठ शिक्षक कृष्णकुमार रघुवंशी, शारीरिक शिक्षक अनिल मनवर ,तसेच आदर्श कम्प्युटर इन्स्टिट्यूट अध्यक्ष नितीन पाटील व अजय पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे चे पूजन करून अभिवादन करण्यात आले .नंतर एमकेसीएलचे अध्यक्ष पाताळे त्यांनी विद्यार्थ्याला उद्बोधन करून सर्व शिक्षकांना सन्मानपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा किरण कांबळे यांनी शिक्षकांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. शिक्षक हा समाज घडविणारा महत्त्वाचा घटक असतो .

बातम्या आणखी आहेत...