आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणी:शिक्षक, कर्मचाऱ्यांना‎ दिवाळीपूर्वी पगार द्यावा‎; विमाशीच्या पदाधिकाऱ्यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन‎‎

राळेगाव‎ ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर‎ कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर आणि‎ नोव्हेंबर महिन्याचे वेतन‎ दिवाळीपूर्वी करावे, अशी मागणी‎ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या‎ वतीने शुक्रवार, ३० सप्टेंबर रोजी‎ माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री‎ राऊत यांना निवेदनाद्वारे केली.‎ ‎शिक्षकांचे वेतन अनियमित होते.‎ परिणामी, शिक्षकांसह त्यांच्या‎ कुटुंबावर उपासमारीची वेळ येत‎ आहे. त्यामुळे सण, उत्सव साजरे‎ करताना अडचणी निर्माण होत‎ आहे.

अशा परिस्थितीत यंदा‎ दिवाळीपूर्वी ऑक्टोबर आणि‎ नोव्हेंबर महिन्याचे वेतन अदा‎ करावे, अशी मागणी विदर्भ‎ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने‎ करण्यात आली. यासंदर्भात‎ माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री‎ राऊत यांना विमाशीच्या‎ पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी निवेदन‎ दिले.‎ यावेळी जिल्हाध्यक्ष अश्फाक‎ खान, प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद‎ देशमुख, विभागीय कार्यवाह‎ मुरलीधर धनरे, यवतमाळ जिल्हा‎ कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे,‎ जिल्हा कार्याध्यक्ष विजय खरोडे,‎ मनोज जिरापूरे, जिल्हा उपाध्यक्ष‎ पवन बन, विलास वाघमारे,‎ सिर्तावार, प्राचार्य खैरे आदी‎ पदाधिकारी उपस्थित होते, अशी‎ माहिती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष‎ श्रावणसिंग वडते यांनी प्रसिद्धी‎ पत्रकाद्वारे दिली.‎

बातम्या आणखी आहेत...