आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा प्रादुर्भाव:शिक्षकांना 3 वर्षांपासून पुरस्कारच नाही ; शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर

बुलडाणा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

५ सप्टेंबर रोजी उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असते. विशेष म्हणजे अनेक शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले. परंतु अद्यापही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त सापडला नाही. मागील तीन वर्षांपासून शिक्षक पुरस्काराची प्रतीक्षा करत आहेत. परंतु अद्यापही या पुरस्काराबाबत कुठल्याच हालचाली झाल्या नसल्याने यंदाही पुरस्काराचे वितरण होणार की नाही, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

मागील दोन ते अडीच वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाने सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली होती. शिवाय कोराेनामुळे शिक्षकांना पुरस्कारापासून वंचित रहावे लागले होते. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध हटवून कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली. शिक्षक दिनानिमित्त अनेक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. शिवाय अनेक शिक्षकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. परंतु अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनाकडून या पुरस्काराबाबत कुठल्याही हालचाली झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदाही शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागणार काय, असा प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत. विद्यार्थी घडवताना कुठलीही तमा न बाळगता शिक्षक तळमळीने आपली सेवा बजावत असतात. त्यांचा योग्य वेळी सन्मान झाल्यास त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळते. शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान होणे अपेक्षित असते. परंतु तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

बातम्या आणखी आहेत...