आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबसमध्ये बाजूला बसलेल्या वृद्ध प्रवाशाने छेड काढली. मात्र, न डगमगता तिने मध्येच खाली उतरलेल्या वृद्धाचा पाठलाग करत भावाच्या मदतीने त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी बुलडाणा पोलिसांनी तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. बुलडाणा येथील रहिवासी असलेली २० वर्षीय युवती चिखली येथील महाविद्यालयात शिकत आहे. ती बसने बुलडाण्याकडे परत येत होती. या वेळी तिच्या बाजूला बसलेल्या समाधान परशराम सुरगडे वय ६३, रा. विदर्भ हाउसिंग सोसायटी, बुलडाणा याने तिची छेड काढली.
युवतीने आपल्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. यामुळे घाबरलेला वृद्ध बुलडाणा बसस्थानक ऐवजी मध्येच चांडक ले आऊट थांब्यावर उतरला. युवतीही खाली उतरली व त्याचा पाठलाग केला. याचवेळी तिचा भाऊ व इतर नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सुरगडे याला बुलडाणा शहर ठाण्यात आणले. युवतीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.