आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक अडचणी:ई पॉस मधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात

लोणारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून जनतेला शासनाकडून स्वस्त धान्याचे वाटप करण्यात येते. दीपावलीनिमित्त धान्याचे वाटप करण्यासाठी ई पॉसमशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे धान्याचे वितरणात विलंब होत आहे. त्यामुळे दुकानदार व नागरिकांमध्ये वाद-विवाद होत आहेत. त्यातच सर्वर डाऊन असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व नागरिक या तांत्रिक अडचणींमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वितरण व्यवस्थेअंतर्गत ई पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार सैफन नदाफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

शासनाने घोषित केल्याप्रमाणे आजपर्यंत दिवाळीचे रेशन तालुक्यातील काही दुकानदारांना मिळाले नाही तसेच आनंदाचा शिधा सर्वच दुकानदारांना ई डी वन रजिस्टर प्रमाणे देण्यात यावा, जेणे करुन कार्डधारकांना माल कमी पडणार नाही. सर्वच दुकानदाराचे डी वन रजिस्टर प्रमाणे कार्डधारक योजनानिहाय ऑनलाइन करण्यात यावे, जळगाव जामोद तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व वडगाव वान येथील स्वस्त धान्य दुकानदारांना रेशन कार्डधारकांनी मारहाण करून ही ई पॉस मशीन फोडली आहे. आरोपीला तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भगवान कोकाटे, संजय पवार, हाजी नसीम, श्रीराम आघाव, तानाजी अंभोरे, रवींद्र हिवाळे, पांडुरंग नागरे, अनिल काकड, शेख अमीर, रामराव मुंढे, शिवानंद हजबे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...