आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कामात अडथळा; एका विरुद्ध गुन्हा दाखल‎:तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी केली तामगाव पोलिसांत तक्रार‎

संग्रामपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसीलदार यांच्या दालनात‎ तहसीलदार, महसूल कर्मचारी काम‎ करत असताना एक युवक काही‎ एक कारण नसताना आरडाओरड‎ करुन मोबाइलमध्ये विना परवानगी‎ व्हिडीओ चित्रण करत होता. तसेच‎ शासकीय कामाची गोपनीयता भंग‎ केली. याबाबत महसूल कर्मचारी‎ सदर युवकास समजावण्यास गेले‎ असता शिविगाळ करून‎ धक्काबुक्की केली. या कारणावरून‎ शासकीय कामात अडथळा निर्माण‎ केल्याचा तहसीलदारांच्या‎ तक्रारीवरून तामगाव पोलिसांत‎ मंगळवार, दि.११ एप्रिल रोजी गुन्हा‎ दाखल करण्यात आला. गुन्हा‎ दाखल केल्या युवकाचे नाव नंदू‎ खानझोड रा.पंचाळा याच्या असे‎ आहे.‎

याबाबत थोडक्यात हकीकत‎ अशी की, तहसीलदार व महसूल‎ कर्मचारी हे शासकीय कामकाज‎ करीत असताना नंदू खानझोड‎ रा.पंचाळा हा युवक‎ तहसीलदारांच्या दालनात दारु पिवून‎ आला व काही कारण नसताना‎ मोठमोठ्याने आरडाओरड करुन‎ मोबाइलमध्ये विना परवानगीने‎ िव्हडीओ शुटींग काढुन शासकीय‎ कामाची गोपनीयता भंग केली.‎

तसेच काही कर्मचारी त्या‎ समजावण्यास गेले असता त्यांना‎ सुध्दा देखील शिविगाळ करून‎ धक्का बुक्की करत शासकीय‎ कामात अडथळा निर्माण केला.‎ याप्रकरणी तहसीलदार मुरलीधर‎ गायकवाड यांनी दिलेल्या‎ तक्रारीवरून आरोपी नंदू खानझोड‎ रा.पंचाळा याच्या विरुद्ध विविध‎ कलमान्वये गुन्हा दाखल केला‎ आहे.‎ या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव‎ पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद‎ उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पोलिस‎ उपनिरिक्षक दीपक सोळंके हे करत‎ आहे.‎