आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना रुग्ण:जिल्ह्यात दहा व्यक्ती पॉझिटिव्ह ; रॅपिड चाचण्याद्वारे तपासणी

बुलडाणा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयोगशाळेत रॅपिड चाचणी द्वारे तपासलेल्या ५५३ अहवालांपैकी ५४३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून दहा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील ६ व रॅपिड चाचणी मधील ४ अहवालांचा समावेश आहे.आज रोजी रूग्णालयाने ८८ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण रूग्णांचा निगेटिव्ह अहवाल ८४०३९१ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ९९७४८ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ९८९८२ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचा उपचार घेत असलेला ७५ रुग्ण आहे. तसेच आजपर्यंत ६९१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...