आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:काश्मिरात अतिरेकी हल्ला, बुलडाण्याचा जवान शहीद; सोपोरमध्ये चंद्रकांत भाकरे यांच्यासह तिघांना वीरमरण

संग्रामपूर (बुलडाणा)एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • चकमकीदरम्यान दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांची गोळ्या लागल्या आहेत

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये शनिवारी अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले. यात बुलडाणा जिल्ह्यातील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (३८) यांचा समावेश आहे. ते संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी होते. या हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचारीही जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-ताेयबा या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

इतर शहीदांत बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राजीव शर्मा (४२) गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील परमार सत्यपाल सिंग (२८) यांचा समावेश आहे. 

सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त नाका पार्टीवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यात जाविद अहमद अमीन व विश्वजित घोष या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही गोळ्या लागल्या आहेत. याआधी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील नेवा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला आणि सीआरपीए आणि पोलिसांच्या संयुक्त छावणीला लक्ष्य केले. 

बातम्या आणखी आहेत...