आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेत्यांच्या विरुद्ध आकसपूर्ण बुद्धीने ईडी ची कारवाई करण्याच्या केंद्रातील भाजपा सरकारच्या निषेधार्थ आज येथील जयस्तंभ चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने थाळी नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांनी केले होते.
या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, उपाध्यक्ष चित्रांगण खंडारे, गणेश राजपुत, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड .विजय सावळे, प्रा.संतोष आंबेकर, दीपक रिंढे, विनोद बेंडवाल, तेजेंद्रसिंग चव्हाण, व एकनाथ चव्हाण, एन.एस यु.आय.जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर, मिलिंद जैस्वाल, मीनल आबेकर,बंडू काळवाघे, संतोष पाटील, रवि पाटील, अमोल वानखेडे, राजू काटीकर, महेश ढगे, नीलेश हरकल, साहेबराव चव्हाण, प्रमोद जाधव,प्रतिक जाधव, अमित तायडे,शेख सत्तार, सोपान पाटील,राजु राठोड, नंदू राजपूत,कलीम खान,अॅड.अनंतराव वानखेडे, शेख नदीम,सय्यद मतीन , शेख समीर, नितीन राठोड, स्वप्नील देशमुख, सुरेश सरकटे, चंदुभाऊ, गौरव नाईक, सुनील पनपालीया ,सुरेश चव्हाण, रोहिदास राठोड, कैलास सुखदाणे, सुरेश इंगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.