आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ:केंद्र सरकारच्या जीएसटीविरोधात एमआयएमचे थाळीनाद आंदोलन

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ व शैक्षणिक साहित्यावरील जीएसटी रद्द करावी, या मागणीसाठी एमआयएम च्या वतीने आज २९ जुलै रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करण्यात आले. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. मोबीन खान यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये केंद्र सरकारने नुकतेच अन्न धान्य दुग्धजन्य पदार्थ व शैक्षणिक साहित्यावर जी.एस.टी. आकारली आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली होती. या वर्षीपासून थोडी आर्थीक परिस्थिती सुधारत असताना नव्यानेच केंद्र सरकारने जनतेच्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी आकारली आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला हलाखीचे जीवन जगण्यास भाग पाडले जात आहे. तसेच सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्या नसल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे.

दिवसागणिक शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण देखील वाढत आहे. परंतु केंद्र शासन कुठल्याही ठोस उपाययोजना करीत नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंवर लावलेली जीएसटी रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात एम आयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. मोबीन खान, अकील अहेमद, शेख मुज्जमील, इरफान शहा, मो. शिफात, साजीद शेख, शोहेब अली, शेख समशेर, देऊळगावराजा शहराध्यक्ष सलीमोद्दीन, लोणारचे अमजदखान, सिंदखेडराजा मो. इमाम, अतुल भवसारी, शेख सलमान, शेख मुजाहिद, मुन्नवर अहेमद, शहानवाज खान, इम्रानखान मेहकर, रहेमान खान, इक्बाल खान लोणार, युसूफ खान, अनिस शहा, यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...