आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यामध्ये अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू असून नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांच्या पथकाने आज रविवार, दि.९ एप्रिल रोजी अवैध वाळू करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करून तामगाव पोलिसांत लावण्यात सांगितले असता रस्त्यावर रेती खाली करून ट्रॅक्टर चालक व मालक ट्रॅक्टर घेवून पळून गेले. याप्रकरणी तामगाव पोलिसांत नायब तहसीलदारांनी दिलेल्या लेखी फिर्यादी वरुन ट्रॅक्टर चालक, मालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांनी तामगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून रविवार, दि.९ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान नायब तहसीलदार व पथकातील सहकारी मंडळ अधीकारी, तलाठी हे वरवट बकाल ते संग्रामपूर रोडने अवैध गौण खनिज वाहतुक बाबत कार्यवाही करणेसाठी एका कापूस जिन येथे थांबले असता रस्त्याने एक लाल रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह वरवटकडुन येतांना दिसला. त्यास हाताने इशारा करुन सोबतच्या स्टाफचे मदतीने थांबवले असता सदर ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू किमत अंदाजे ३ हजार २०० रुपयाची भरलेली दिसुन आली. यावरुन ट्रॅक्टर चालक अविनाश भाऊराव गायकवाड रा.मोमीनाबाद असे सांगितले वरुन त्यास सदर ट्रॅक्टरचे मालक आशिष रवींद्र बकाल रा.वरवट बकाल यांचे मालकीचा असल्याचे सांगीतले.
तसेच ट्रॅक्टर मधील वाळू बाबत रॉयल्टी आहे का, अशी विचारणा केली असता त्यांच्याकडे रॉयल्टी नसल्याने वरुन सदर ट्रॅक्टर पुढील कार्यवाही करीता तामगाव पोलिस स्टेशन येथे नेण्यास चालकास सांगितले. असता रस्त्यावर सदर ट्रॅक्टरचा मालक मोटर सायकलने आला व त्याने ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टरचे ट्राॅली मधील वाळू खाली करण्यास सांगितले. वरुन चालकाने ट्रॉलीमधील वाळू खाली करुन ट्रॅक्टरचा मालक व चालक हे ट्रॅक्टर घेऊन पळून गेले. तसेच ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु रस्त्यावर वर्दळ असल्याने व रस्ता अरुंद असल्याने ट्रॅक्टर थांबवता आले नाही असे नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे, मंडळ अधिकारी रवींद्र बोराखडे, तलाठी एस.एस.कुसळकार, तलाठी खरे यांच्या तक्रारीवरून चालक, मालकावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.