आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बुलडाणा-सुंदरखेड मार्गावरील अपघातग्रस्त खड्डा बुजवण्यास प्रशासनास मुहूर्त सापडेना

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून बुलडाणा-सुंदरखेड रोडवरील आरा मशिनजवळ भला मोठा नाली युक्त खड्डा पडला आहे. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात घडले असून आज शुक्रवारी सकाळी तीन अपघात घडले आहेत. यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी वाहनधारक जखमी झाले आहे. या खड्ड्यांतून वाहन उसळत असल्यामुळे अपघात घडत आहेत.

सतत अपघाताच्या घटना घडत असताना देखील प्रशासनास हा खड्डा बुजवण्याचा मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे काय, असा प्रश्न वाहनधारक उपस्थित करीत आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच बुलडाणा ते भादोल्या पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात सुंदरखेडसाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची पाइपलाइन टाकण्यासाठी आरा मशीन जवळ हा रस्ता खोदला होता. परंतु खोदलेला रस्ता बुजवण्यात न आल्यामुळे या ठिकाणी मोठा नाली युक्त खड्डा पडला आहे.

खड्ड्यांमुळे अपघात होवू नये, यासाठी रस्त्याच्या शेजारी असलेल्या व्यावसायिकांनी दगड व मुरूम टाकून तो बुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु या खड्डामय नाली मधून पाणी वाहत असल्याने हा खड्डा जैसे थे होत आहे. त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी हा खड्डा बुजवण्यात यावा, अशी मागणी वाहनधारक करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...