आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम आदमी पार्टीचे‎ साखळी उपोषण सोडवले‎:आंदोलनाची प्रशासनाकडून पाचव्या दिवशी दखल‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चौदाशे दुकाने‎ उठवल्यानंतर त्यांना पक्की दुकाने‎ बांधून दिली नाहीत तसेच व्यवसाय‎ करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे‎ मोठे व्यापारी संकुले नाहीत याच्या‎ निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या‎ वतीने गेल्या चार दिवसांपासून‎ साखळी उपोषण सुरु करण्यात‎ आले होते. या उपोषणाची पाचव्या‎ दिवशी न.पा.प्रशासनाकडून दखल‎ घेण्यात आली. हे साखळी उपोषण‎ लेखी आश्वासनाद्वारे सोमवारी मागे‎ घेण्यात आले.‎ शहरांमध्ये कुठलेही मोठे‎ उद्योगधंदे नसताना युवकांना‎ बेरोजगारीस सामोरे जावे लागत‎ आहे. बेरोजगारांना रोजगाराकरिता‎ दुसरीकडे स्थलांतरित व्हावे लागते.‎ स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी‎ नगर परिषदेने कुठल्याही प्रकारची‎ मोठी योजना अंमलात आणली‎ नाही.

तसेच शहरातून चौदाशे‎ दुकाने उठवल्यानंतर त्यांना पक्की‎ दुकाने बांधून दिली नाहीत.‎ व्यवसाय करण्यासाठी कुठल्याही‎ प्रकारचे मोठे व्यापारी संकुले‎ नाहीत. सुशिक्षित बेरोजगारांनी‎ व्यवसाय करायचा तरी कुठे शासन‎ आणि प्रशासन या दोघांचाही‎ शहरातील प्रमुख समस्येकडे दुर्लक्ष‎ होताना दिसून येत असल्याचा‎ आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने‎ हे सुरु होते. हे उपोषण आज‎ सोडवण्यात आले. यावेळी नगर‎ पालिका प्रशासनाद्वारे लेखी‎ आश्वासन देवून सोडवले.‎