आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्याग्रह:महिलांचे दारू दुकानासमोर 5 दिवसांपासून आंदोलन सुरू

बिबी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामसभेत बेकायदेशीर ठराव घेऊन देशी दारूच्या दुकानाला ना हरकत देण्यात आल्याने संतप्त महिलांनी दारू दुकान विरोधात लढा सुरू केला आहे. विभागीय आयुक्तांनी ग्रामसभा नियमानुकूल करेपर्यंत ठरावाची अंमलबजावणी करू नये, असे आदेश दिले आहेत. तरी सुध्दा प्रशासन कारवाई करत नसल्याने महिलांनी दारूच्या दुकानासमोर बैठा सत्याग्रह सुरू केला.

आज या आंदोलनाचा पाचवा दिवस उजाडला आहे. परंतु अद्यापही प्रशासनाने दारूबंदीचा विषय गांभीर्याने घेतला नसल्याचे दिसून येत आहे. सुनीता भांड यांच्यासह महिलांनी या आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील देशी दारूचे दुकान बिबी येथे सुरू करण्याचा घाट यशस्वी करण्यात आला आहे. प्रशासन दारू विक्रेत्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...