आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात सध्या जलवाहिन्या फुटून पाणी अपव्यय होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच नवीन पाइपलाइन टाकल्यानंतर त्यातील माती व मुरुमाचे खडे रस्त्यावर विखुरलेले असल्याने त्यात पाणी साचून चिखल निर्माण होत आहे. या चिखलामुळे अनेक अपघाताच्या मालिकाच घडत आहे. फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी अपव्यय होत असतांना नागरिकांच्या नळाला मात्र पाण्याचा थेंब येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेच्या निष्क्रीय कारभाराबद्दल नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
बुलडाणा शहराला पाणी पुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी कोठेतरी फुटलेली आहे. बहुतांश ठिकाणी वॉलच लिकेज करुन ठेवण्यात आले आहे. येळगाव वरुन येणार्या जलवाहिनी लिकेज असल्याचे दिसत आहे. हाच अुनभव शहरात आल्यानंतरही दृष्टीस पडत आहे. बांधकाम अभियंता यांचे बंगल्यासमोरही अशीच अवस्था आहे. बुलडाणा शहरातील पाईप लाईन पंचवीस वर्ष जुनी झाल्याने ती आता बदलली जात आहे. परंतु, जयस्वाल ले आऊट, मच्छी ले आऊटसाठी चार वर्षापूर्वीच महात्मा फुले शाळेपासून जलवाहिनी बदलण्यात आली होती.
ती आजही का फुटते हे कळत नाही. येथुनही मोठया प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. आतातर खोदण्याचे कामात पुन्हा एकदा ही जलवाहिनी फुटुन मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. पुढे मातोश्री क्रीडा मंडळ व देवीचे मंदिर असलेल्या तार फिनिशिगच्या बाजुने खोदण्यात आले तेथे तर चार दिवसांपुर्वी तब्बल पाच तास पाणी वाहत होते. लाखो लीटर पाणी वाहत गेले पण पालिकेने काहीच केले नाही आज पुन्हा तीच परिस्थिती आली व लाखो लिटर पाणी वाहत गेले. येथील चौकातील व्हॉल्वतर नेहमीच फुटुन पाणी वाहत राहते.
पाण्याने झाला चिखल महात्मा फुले शाळेपासुन तर पुढे जात असतांना दुध डेअरी असलेल्या चौकापर्यंत माती रस्त्यावर साचली आहे. खोदकामातील ही माती आहे. त्यातच पाणी रस्त्यावर सोडल्याने व पाईप लाईन फुटल्याने ही माती चिखलमय बनते व येथे अपघात घडत आहेत. येथील लोकांच्या म्हणण्यानुसार आतापर्यत चार ते पाच जणांना पडण्याचा अनुभव आला आहे तर काहींना घसरण्याचा अनुभव आला आहे. मात्र पालिकेने याचा अनुभव एकदा घेऊन कंत्राटदारालाही घेऊ दयावा, अशी मानसिकता लोकांची बनली आहे.
वारंवार फुटते जलवाहिनी तानाजी नगर मधील जलवाहिनी फुटणार नाही. कॉकमधुन पाणी वाहत राहणार नाही. ही आजची बाब नाही तर लोकांना हा नळ आले येणारा नेहमीचा अनुभव आहे. काही ठिकाणी तर कितीही दुरुस्त करा जलवाहिनी फुटुन त्यात डुकरांनी लोळावे. तेच पाणी लोकांना जाणे हे लोकांना दिसते पण करणार काय. कारण या भागात जलवाहिनी फुटणे हे जसे काही वरदानच मिळाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.